मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dhule लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धुळे शहरातील रस्ते आणि रुग्णालयांसाठी महापालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई, दि.1 : धुळे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. धुळे महानगरपालिकेला अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, वित्त विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी यावेळी उपस्थित होते. धुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन 80 फुटी रोड येथे मॅटर्निटी होम; तर चक्करबर्डी परिसरात सार्वजनिक रुग्णालय बांधण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच धुळे शहरातील विविध मुख्य रस्ते तयार करण्यासाठी 10 कोटी रुपयांची गरज आहे. असे एकूण 20 कोटी रुपये महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी श्री. कदमबांडे यांनी केली. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लहान महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सु

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.