पर्यावरण संतूलनासाठी गेल्या काही वर्षात लोक चांगलेच जागरूक झाले असून घरासमोर विविध झाडे, वेली, वृक्ष लावून पर्यावरणावरचे आपले प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी नारळाचे वृक्ष देखील लावण्यात आले असून ठिकठिकाणाच्या नारळाच्या झाडांना फळे लागत असल्याचे दिसते. परंतू नारळाची झाडे बरीच उंच असल्यामुळे झाडाला लागलेली फळं काढता येणे शक्य होत नाही. झाडावरील फळं (शहाळे) काढण्यासाठी नारळाच्या झाडावर चढणारे भरपूर पैसे घेत असल्याची तक्रार असून यापेक्षा फळ झाडावरच असलेले चांगले अशी भावना लोकांची झाली आहे.