मुंबई, ता. १६- जम्मू येथे झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजेत्या उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची धुरा सांभाळत असतानाच उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन्ही संघाने आपल्याला ही विजयाची बहुमोल भेट दिली असल्याचे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत मोकल, कर्णधार अक्षय उघाडे, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक संतोष शिर्के, कर्णधार प्राजक्ता तापकिर आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांची चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डीचे तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.