मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फ्युनिक्युलर ट्रॉली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास अंतिम मंजूरी: कामाला लवकरच सुरवात

हाजी मलंगगड (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथे येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक फ्युनिक्युलर यंत्रणा बसविण्याच्या प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल (ता. २५) अंतिम मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरवात करता येणार आहे. राज्यातील उंचावरील देवस्थानांच्या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची संकल्पना मांडणार्‍या सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा यासाठी मोलाचा ठरला आहे. हाजी मलंगगडासह सप्तशृंगी गड, माहुर गड आणि जेजुरी या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची कल्पना श्री. भुजबळ यांनी मांडली होती. सप्तशृंगी गडावरही फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून उर्वरित दोन गडांवरील कामेही लवकरच मंजूर केली जातील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हाजी मलंगगड येथे प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी १० मार्च २००८ ला मिळाली असली तरीही हा प्रकल्प माथेरान इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असून याला माथेरान मॉनिटरिंग कमिटी तसेच केंद्रीय वन व पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली...