मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

minglish लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"व्हाइटवॉश" मुळे होताहेत जुने शब्द "वॉश"

ठराविक अंतरानंतर भाषा बदलते असे म्हणतात...काळाच्या ओघात काळाच्या प्रवाहाबरोबर जावे, असे म्हणतात...! टप्प्याटप्प्याने प्रवास करणार्‍या पथिकांना तर बदललेली भाषा लगेच जाणवते. एके काळी अस्खलित असणारी मराठी भाषाही याला अपवाद कशी असणार? गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत इंग्रजी शब्द रूढ होत असल्याचा (मिंग्लीश) प्रत्यय सध्या येत आहे. दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, यामुळे भारत आणि भारतीयांवर स्वाभाविकच इंग्रज आणि इंग्रजीचा पगडा बसला. तेव्हाची आणि आजची मराठी भाषा...यात बरेच अंतर असल्याचे दिसून येते. मराठी भाषेत इंग्रजीचा प्रवेश बहुदा "सॉरी.." या शब्दापासून झाला असावा. क्षमा करा, माफ करा, माफी असावी हे पूर्वीचे शब्द आजकाल अगदी बोटावर मोजण्याइतके लोक वापरताना दिसतात. यापेक्षा 'सॉरी' म्हणा आणि 'कामाला लागा' अशी विचारसरणी तयार झाली आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचे असल्यास, एखादी घोडचूक झालेली असल्यास सहसा कार्यालये, नोकरी, उद्योग, कामाचे ठिकाण अर्थातच जॉबचा कॅम्पस् अशा ठिकाणी तर बहुतेक कामे होण्यासाठी 'चहा' हे पेय उपयोगी ठरते हा भाग वेगळा. चहा देखील आण...