मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नाशिक फेस्टिव्हल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इटलीचा विवियानी इलिया आंतरराष्ट्रीय रेसमध्ये; कर्नाटकचा साबू गांगर राष्ट्रीय स्पर्धेत विजेते

  नाशिक (वार्ताहर) - नाशिक फेस्टिव्हल निमित्ताने भुजबळ फाऊंडेशन आणि आयडी स्पोर्ट्स आयोजित आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा शुक्रवारी नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाली. इटलीच्या 'लिकवी गॅस' टीमचा विवियानी इलिया तर राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकचा साबू गांगर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे सहा हजार युरो आणि सव्वालाख रुपयांचे बक्षीस राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकचे खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले. स्वीस येथील इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन, द युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आणि इंडियाज सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भारतात 'टूर द मुंबई' ही नाशिक आणि मुंबई येथे दोन टप्प्यात सायक्लॉथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारी मुंबईत संपन्न झाला. नाशिकच्या स्पर्धेत सुमारे पाच हजार दोनशे सायकलस्वारांनी सहभाग घेतला. यात १०८ आंतरराष्ट्रीय, ६८ राष्ट्रीय स्पर्धक होते. उर्वरित स्पर्धकांमध्ये नाशिक शहरातील आम नागरीक, तरुण तरुणी आदींचा समावेश होता. सुमारे २५ हजार नाशिककरांनी विविध रेस पाहिल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धक...