पुणे, ता. १७ - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले. पंडित भीमसेन जोशी यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक मात्र स्थिर आहे. त्यांच्यावर हिमोडायलिसिस करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.