सोलापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोलापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ मार्च, २०१४

मुख्यमंत्री-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी

मुंबई, दि. 11 मार्च 2014: मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे आणि पुनर्वसनमंत्री श्री पतंगराव कदम यांनी दि. 11 मार्च 2014 रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानाचा आढावा घेतला. या दौ-यामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी व कनबस येथे नुकसान झालेली द्राक्ष, केळी व पपईची बाग, तसेच गहू, हरबरा व ज्वारीच्या शेतावर जाऊन शेतक-यांच्या हानीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री श्री चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री ठाकरे आणि पुनर्वसनमंत्री श्री कदम यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे पपई बाग, गहू, हरबरा, ज्वारीचे पीक आणि वादळामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. तीनही नेत्यांनी मंगरूळ येथे ग्रामस्थांशी चर्चा केली व मदतीसंदर्भात त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. या नेत्यांनी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लामजाना येथे द्राक्षबाग व इतर पिकांची पाहणी करून शेतक-यांच्या नुकसानाचा आढावा घेतला. किल्लारी येथे शेतकरी व नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. पीडितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे नैसर्गिक संकट मोठे असले तरी शेतक-यांनी चिंता करू नये; महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल, या आश्वासक शब्दात धीर दिला. सायंकाळी त्यांनी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील आन्वीचा दौरा केला. या ठिकाणी त्यांनी मोसंबी बाग, कांदा, गहू, ज्वारी व इतर पिकांची पाहणी केली. याठिकाणी देखील मुख्यमंत्र्यांनी गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली.

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत समाधान घोडकेचे आव्हान संपुष्टात

पिंपरी (3 डिसेंबर 2013) : महाराष्ट्र केसरीचा दुसरा मुख्य दावेदार असलेला सोलापूरचा समाधान घोडके याचे आव्हान मुंबई उपनगरच्या सुनिल साळुंके याने एक गुणाने कुस्ती जिंकून संपुष्टात आणले. महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मान्यतेने व महेशदादा स्पोटर्स फाउंडेशनच्या वतीने पै. किसनराव लांडगे यांच्या 71 व्या वाढ दिवसानिमित्त भोसरी येथे कै. पै. मारुती रावजी लांडगे क्रिडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी व 57 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात हे सामने घेण्यात आले. यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्पर्धा प्रमुख विलास कथुरे, संयोजक व नगरसेवक महेश लांडगे, ऑलिम्पीक मारुती आडकर, सितारामभाऊ भोतमांगे, पिंपरी चिंचवड कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, योगेश दोडके, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, मुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, विजय बनकर, पंच उत्तमराव पाटील, दिनेश गुंड, अंकुश वलकडे, दिलीप पवार, संभाजी वरुटे, बंकट यादव आदींसह हजारो कुस्ती शौकिन उपस्थित होते. या कुस्ती सामन्यांचे सुत्रसंचालन बाबा लिम्हण, शंकर पुजारी यांनी केले. 74 किलो गादी विभागात संतोष गायकवाड (अहमदनगर) आणि रणजित नलावडे (कोल्हापूर जिल्हा) हे सुवर्ण पदकासाठी भिडणार आहे. तर प्रसाद सस्ते (पिंपरी चिंचवड) आणि चंद्रशेखर पाटील (लातूर) हे दोघे कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत. 74 किलो माती विभागात रविंद्र करे (पुणे जिल्हा) याने जयदिप गायकवाड (सातारा) याच्यावर 11 विरुध्द 4 असा 7 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर विश्वभंर खैरे (बीड) याने अण्णा गायकवाड (अहमदनगर) याच्यावर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत फेरी गाठली. 60 किलो माती विभागात दादा सरवदे (सोलापूर शहर) याने देवानंद पवार (लातूर) याचा 5 विरुध्द 3 अशा 2 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. तर अरुण खेंगले (पुणे जिल्हा) याने राहूल यादव (मुंबई उपनगर) याच्यावर 7 विरुध्द 5 अशा 2 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 60 किलो गादी विभागात विशाल माने (कोल्हापूर जिल्हा) आणि सोनबा गोंगाणे (कोल्हापूर शहर) यांची अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी लढत होणार आहे. 96 किलो माती विभागात दुस-या फेरीत मुंबईच्या संतोष सुतारने पिंपरी चिंचवडच्या प्रमोद मांडेकरवर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित आपली घौडदौड सुरु ठेवली असे तुळशीदास शिंदे यांनी कळविले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...