नागपूर, ता. ५- अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री व खोखो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी या स्पर्धेत कौशल्यपूर्ण खेळ दाखवत आपली चुणूक दाखविली आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कर्णधार निकिता पवार, प्राजक्ता कुचेकर, पौर्णिमा सपकाळ आदींचा संघात समावेश होता. चंद्रकांत कांबळी यांनी मार्गदर्शक म्हणून तर एस. जी. भास्करे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.