मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अमृत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चहास्तोत्रम्...

शीण सुस्ती महानिद्रा, क्षणात पळवी चहा प्रभाते तोंड धुवोनी, घेता वाटे प्रसन्नता... अर्धांगिनी हस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे पुन्हा स्नानांतरे घेता, अंगी चैतन्य सळसळे... लिंबुयुक्त विना दुग्ध, अरुची पित्त घालवी शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी... शितज्वर शिरःशूळा, खोकला नाक फुरुफुरा गवतीपत्र अद्रकयुक्त, प्राशित जाई सत्वरा... भोजनपूर्व प्राशिता, मंदाग्नी, पित्तकारका घोटता घोटता वाढे, टॅनिन जहरकारक... चहाविना आप्त स्नेह्यांचे, स्वागतासी अपूर्णता यास्तव भूतल जन म्हणती ह्याची अमृता... इति सुहासविरतिम् चहास्तोत्रम् चहाबाजप्रित्यर्थम् संपूर्णम्...।।। (संग्रहित...)