मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुंबई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सचिन शिंदे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड

मुंबई, ता. 6- नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशान्वये, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. श्री. शिंदे यांची पक्षनिष्ठा आणि अद्यापपावेतो पक्ष आणि समाज यांच्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सचिन शिंदे म्हणाले, की धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विकास देणारे काँग्रेस सरकार राज्यात व देशात आण्याण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईन. तसेच युवक काँग्रेसच्या मार्फत नवनवीन संकल्पना राबवून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रचंड मेहनत व सर्वसामान्य युवकांचे हक्काचा व्यासपीठ करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेईन या साठी मी वचनबद्ध राहीन असे मी आश्वासन देतो.

मुंबई अनुभवणार 'हवाई फॉम्युला-1' चा थरार

मुंबई, दि. 3: अनेक अभिनव उपक्रमांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात तत्पर असणाऱ्या मुंबईकरांना 'हवाई फॉर्म्युला-1' म्हणून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या 'एअरो-जीपी' या विमान स्पर्धेचा थरार या वर्षअखेरीस अनुभवावयास मिळणार आहे. या स्पर्धेचे भारतातील संयोजक असलेल्या मे. आय इंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विनावित्तीय सहकार्यासाठीचे पत्र काल प्रदान केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची आय-इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरभजन सिंग सहगल यांनी गेल्या सोमवारी या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भेट घेऊन त्यांना पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविले आणि मुंबईमध्ये या उपक्रमाच्या आयोजनासाठी एमटीडीसीकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 'इएसपीएन-स्टार' वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 50हून अधिक देशांत या चित्तथरारक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पुन्हा एकदा नापाकांचे लक्ष्य: मुंबई

मुंबईत लष्कर ए तैय्यबा चे चार अतिरेकी शिरले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिल आहे. २६-११ ची घटना अजून शमत नाही तोच पुन्हा एकदा नापाक अतिरेक्यांचे लक्ष्य शांत आणि सर्वधर्मसमभावासाठी पवित्र मानल्या जाणार्‍या मुंबईकडे आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, स्थानके, विविध धार्मिक स्थळे आणि अतीसंवेदनशील भागांना अतिरेकी लक्ष्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही तासातच नाताळ सण सुरू होत असून लवकरच नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव याच्या उधाणाचा उत्साह पसरेल. या पार्श्वभूमीवर पोलिसांना व विशेष पथकास पाचारण करण्यात आले असून नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. २६-११ घटनेतील हाती लागलेला आरोपी कसाब हा पाकिस्तानचा नागरीक असल्याचे सबळ पुरावे देखील उपलब्ध झाल्याचे न्यायालयात सिद्ध करण्यात आले आहे. विविध क्लुप्त्यांनी कसाब स्वतःची सुटका न्यायालयातून करवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप संसदेवर हल्ला करणार्‍यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आलेली असली तरीही अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतिंकडे प्रकरण गेले असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. क