मुंबई, ता. 6- नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशान्वये, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. श्री. शिंदे यांची पक्षनिष्ठा आणि अद्यापपावेतो पक्ष आणि समाज यांच्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सचिन शिंदे म्हणाले, की धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विकास देणारे काँग्रेस सरकार राज्यात व देशात आण्याण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईन. तसेच युवक काँग्रेसच्या मार्फत नवनवीन संकल्पना राबवून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रचंड मेहनत व सर्वसामान्य युवकांचे हक्काचा व्यासपीठ करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेईन या साठी मी वचनबद्ध राहीन असे मी आश्वासन देतो.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.