कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आपले मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. आपल्याला पदउतार करण्याच्या पक्षाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान देऊन बुद्धीकौशल्याने यातून सोडवणूक करून घेतली. भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर दबाव वाढत होता. दरम्यान भूखंड गैरव्यवहारात नाव गोवले जाताच, येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते. यामुळे येडियुरप्पा यांची बाजू आणखी मजबूत झाली. या प्रकरणी त्यांना चर्चेसाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्ली येथे बोलावले असता, प्रारंभी स्वतः न जाता त्यांचे दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे पाठवून चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी श्री. येडियुरप्पा पुट्टूपूर्ती येथे जाऊन सत्यसाईबाबा यांच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी यानंतर दिल्ली गाठून माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा आणि रेड्डी यांच्या घोटाळ्याच्या फाइलीच सोबत ठेवल्या होत्या. पक्षनेत्यांनी दिलेला आदेश पाळू अशी भूमिका कायम ठेवून अन्यथा पाठिंबा काढून घेण्याबाबत खडसावायला सुद्धा ते विसरले...