मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

sachin tendulkar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

छगन भुजबळ यांच्याकडून सचिन तेंडुलकरचे अभिनंदन

मुंबई, दि. 16 मार्च : शतकांचे महाशतक ही क्रिकेटच्या विक्रमादित्याकडून माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मिळालेली अमूल्य भेट आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे. श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरचे माझ्यासारखे चाहते गेले वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो रोमांचक क्षण आज मिरपूर येथे साकार झाला. सचिनने त्याचे बहुप्रतिक्षित महाशतक आज झळकावले आणि क्रिकेटच्या या विक्रमादित्याने शतकांचे शतक झळकावण्याचा आणखी एक महाविक्रम आपल्या नावावर जमा केला. त्याची ही कामगिरी भारतीय तसेच जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोदविली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.