मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पत्रकारिता पुरस्कार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्व. गुरुनाथ कुलकर्णींचे कोकण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ८ - सर्वसमावेशक राजकारणी, निर्भीड वक्ता, अभ्यासू नेता आणि पत्रकार-कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे सर्वांचे मित्र अशी ओळख असलेल्या स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांचे कोकण विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्या भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कुलकर्णी यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार सर्वश्री प्रताब आसबे यांना गुरुकुल पुरस्कार, प्रकाश कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार, प्रकाश सावंत, शशिकांत सांडभोर, निशांत सरवणकर यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, आमदार उल्हास पवार, माजी आमदार अरविंद सावंत, श्रीमती स्वप्नगंधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार रविंद्र पांचाळ यांनी केले. स्वप्नगंधा कुलकर्णी यांनी आभार मा...