कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: राष्ट्रीय व राज्य स्तरावर क्रीडा संघटनांचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना व्हॉलीबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून त्यासाठी युवा खेळाडूंकडूनही सहकार्य आणि प्रयत्नांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू संजय नाईक यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धेचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. एन.जे. पवार अध्यक्षस्थानी; तर प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. एस.एस. हुंसवाडकर, शांताराम माळी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सूर्यवंशी, रेफ्री मंडळाचे समन्वयक डॉ. सुनील चव्हाण, पी.एस. पंत आणि अतुल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीब...