मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जगदीश खेबुडकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गीतसम्राट हरपला: अजित पवार

मुंबई, ता. ३ - शब्दशृंगारात न्हालेल्या लावणीला मराठी चिरंतन गुंजत ठेवणारा आणि मराठी चित्रपट गीतांना आपल्या शब्दांनी सजवणारा गीतसम्राट हरपला आहे. अशा शब्दात गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोकसंदेशात श्री. पवार म्हणाले, की खेबुडकरांच्या शब्दांनी भक्तांना दत्तगुरुंचं दर्शन घडवं, लहानग्यांना निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्याचं सांगितलं, कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा ठसका दाखवला, तर बुगडी सांडल्याची चुगली न करण्याची गळ देखील घातली. पिंजरा, सामना, साधी माणसं या चित्रपटातील त्यांच्या गीतांनी मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपटगीतांना लोकप्रिय करणार्‍या गीतकारांमध्ये त्यांचे स्थान अत्युच्च होते. त्यांच्या लेखणीतून साकारलेली भक्तीगीते, भावगीते, लोकगीते, चित्रपटगीते मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटगीते पोरकी झाली आहेत.

खेबुडकर यांच्या निधनामुळे श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड - भुजबळ

मुंबई, दि. 3 मे : अनेक वर्षांपासून आपल्या गीतांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांचे मंगळवारी (ता. ३ मे) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर येथील आधार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सोपी, सहजसुंदर शब्दरचना, नादमाधुर्य आणि गेयता ही जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीची प्रमुख वैशिष्टये होती. पी. सावळाराम, शांता शेळके आणि ग.दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग अधिक श्रवणीय बनविण्यामध्ये खेबुडकर यांचा मोलाचा वाटा राहिला. लावणी हा गीतप्रकार सर्वाधिक हाताळणाऱ्या खेबुडकरांनी तितक्याच ताकतीने भक्तिगीते, भावगीते, बालगीते, प्रेमगीते सुध्दा लिहीली. 'पिंजरा...