New Mumbai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
New Mumbai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको

जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र
शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक,
सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण
संस्थांना करण्यात आले आहे.

कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता
मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध
स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या
गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले
आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यातर्फे अशाप्रकारच्या सार्वजनिकहिताच्या उपक्रमाकरिता देण्यात येणारे आर्थिक योगदान हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्याकलम ६९ अंतर्गत कर सवलतीस पात्र करण्यात आले आहे. कोविड-१९ किंवा कोरोनाशी लढण्याकरिता नवीमुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ मध्ये मोठ्या प्रमाणावर आपले आर्थिक योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ चा तपशील खालीलप्रमाणे :
Name of Account : Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Bank Saving Account : 39239591720
Bank : State Bank of India
Mumbai Head Branch Fort : 400023
Branch Code : 00300
IFSC CODE : SBIN0000300


मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आरटीजीएस/एनईएफटी द्वारे आर्थिक सहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी
गृहनिर्माण संस्थेच्या नावासह देण्यात आलेली रक्कम हा तपशील jointregcidco@gmail.com या ई-मेल
आयडीवर पाठवावा
. तसेच धनादेशाद्वारे (चेक) रक्कम देऊ इच्छिणाऱ्यांनी यतिश पाटील यांच्याशी

९७६८०१४४१३ या मोबाइल क्रमांकावर किंवा नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह हाउजिंग सोसायटी फेडरेशनच्या
श्री. भास्कर म्हात्रे यांच्याशी ९८१९३०६९६७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवार, १ जून, २०१३

सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता

मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली. नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले. बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंजूरी दिली. या धोरणानुसार 5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान देण्यासाठी संचालक मंडळाने मंजूरी दिली. त्याचप्रमाणे भाडेपट्टयने वितरित करण्यात आलेल्या भूखंडांवरील बांधकामांकरिता नवी मुंबई जमिन विल्हेवाट अधिनियमानुसार कालावधी देण्यात येतो त्यात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली असून शासनाच्या आदेशानंतर या संदर्भात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. द्रोणागिरी सेक्टर-50 व 51 मध्ये 12.5 टक्केयोजनेअंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 17.84 कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी यावेळी मंजूरी देण्यात आली. 12.5 टक्के योजनेअंतर्गत द्रोणागिरी येथील सेक्टर-52 ते 55 येथे एकात्मिक भौतिक सुविधांच्या विकासासाठी रु. 36.23 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच द्रोणागिरी येथील सेक्टर-15 मधील रस्त्याचा विकास, पावसाळी पाण्याची गटारे, पाणी पुरवठा वाहिन्या व उर्वरित मलनि:सारण वाहिन्यांच्या विकासासाठी रु. 13.35 कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली. वाळूज महानगर प्रकल्पाच्या भविष्यातील विकासाकरिता तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यता अभ्यासासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. नेरुळ-बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे प्रकल्पातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता अंदाजित अर्थसंकल्पानुसार रु. 739.46 लाख खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंबंधातील निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. याचबरोबर नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरती परिक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याच्या योजनेसही या बैठकीत मंजूरी देण्यात आली. वाळूज महानगर प्रकल्पातील नगर-1, 2 व 4 मधील पायाभूत सुविधांसंदर्भातील उर्वरित विकासाकरिता रु. 667 कोटी खर्चासही या बैठकीत मंजूरी देण्यात आली. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...