मुंबई, ता. १ - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाडी पात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना केरोसीनचा पुरवठा करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, कोकणच्या खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी दोन ड्रेझरची खरेदी करण्यात येणार आहे. परंतु ड्रेझर येईपर्यंत शेजारच्या राज्यांमधून भाडोत्री ड्रेझर आणून गाळ उपसण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच कोटी रुपये देण्यात येतील. बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून करेसीन पुरवण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने इतर राज्यांचा अभ्यास करून आठवडाभरात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उद्योगमंत्री नारायण राणे, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायमंत्री मधुकर चव्हाण, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय सचिव अनिल डिग्गीकर, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. पाटील, स...