भारतीय हत्तींची एक जोडी तुर्कमेनिस्तानमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. तुर्कमेनिस्तान सरकारच्या विनंतीवरून ही जोडी पाठविण्यात येणार आहे. भारत सरकारकडून दोन हत्ती भेट मिळावे अशी अपेक्षा तु्रकमेनिस्तान सरकारने केली होती. परंतु वन्यजीवांना भेट देण्यावर भारतात बंदी असल्यामुळे ते शक्य नव्हते. आता, दोन्ही देशांमधील प्राणिसंग्रहालयां दरम्यान देवाण-घेवाण करण्याच्या प्रस्तावाखाली दोन भारतीय हत्ती तिकडे पाठविण्यात येतील. याचाच अर्थ सरकारने स्वत:चा कायद्याची पळवाट शोधून काढली आहे. कायदे करणार्यांनीच शक्कल लढवून कायद्याची पळवाट शोधून काढली आहे, इतरांनी अशा पळवाटा शोधण्यात वाईट काय..? म्हणतात नां, कायदे तितक्या पळवाटा...!