मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लोड शेडिंग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा: अजित पवार

मुंबई, ता. १ - शेतकर्‍यांना शेतीसाठी रात्री दहा तास अखंडितपणे वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पासंबंधातील विरोधकांच्या शंकांचे निरसन करताना अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान व्यत्यय आणणार्‍या विरोधी पक्षाच्या सदस्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की शेतकर्‍यांच्या प्रतिनिधीच्या हातात अर्थ आणि उर्जा खाते असल्यामुळे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या भल्याचे निर्णय घेत आहे. आघाडी सरकार शेतकर्‍यांचे हित बघणारे आहे. शेतकर्‍यांना काळ्या आईची इमान-इतबारे सेवा करता यावी याकरिता त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याज दर, तर ५० हजार ते ३ लाख रुपयांपर् यंत फक्त २ टक्के व्याज दर आकारण्यात आला आहे. राज्यातील भारनियमन संपून वीजेचा अखंडित पुरवठा होण्यासाठी जैतापुर सारख्या वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करताना त्यामध्ये राजकारण आणणे गैर आहे. राज्याने ओव्हरड्राफ्ट घेतला आहे, या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपाचे खंडन करताना ते म्ह