मुंबई, ता. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत उद्या (ता. ५ मे) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे. पत्रकार राजू परुळेकर यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षातील प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील वैभवशाली महाराष्ट्राबाबतचे आपले विचार व्यक्त केले आहेत. राज्याची कृषीप्रगती, शैक्षणिक विकास, अर्थव्यवस्था, सिंचनक्षमता, उर्जास्थिती अशा विविध विषयांवर देखील उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविषयीचे गैरसमज दूरही केले आहेत. मा हिती व जनसंपर्क महासंचालनालयातील निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातील या एक तासाच्या मुलाखतीचे पुनःप्रसारण शुक्रवारी सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत करण्यात येणार आहे.