मुंबई, ता. ९ - जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने चित्रकला सृष्टीचे रंग गहिवरले आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पिकासो म्हणून ओळखल्या जाणार्या पद्मविभूषण एम. एफ. हुसेन यांनी स्वतःची चित्रकला शैली निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अवलिया चित्रकाराने भारतीय चित्रकलेला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे.