प्रेमात सर्व काही माफ असतं..प्रेम हे आंधळं असतं! असं म्हणतात नां..? होय अगदी खरं आहे ते..आता हेच बघा नां... प्रेमात अक्षरशः चिंब झालेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीच्या अटी लग्नापूर्वीच तिला लिखित स्वरूपात म्हणजेच स्टँप पेपरवर लिहून दिल्या. अटींप्रमाणे लग्नानंतर हा पती ठरलेल्या वेळेत घरी आला नाही, तेव्हा त्याला बिचार्याला लिहून दिल्याप्रमाणे चक्क रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले. सन २००७ मध्ये या जोडप्याने लग्न केले होते. हे नवरोबा कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असल्यामुळे बहुदा नेहमीच घरी परत यायला उशीर होतो. नवरोबा मदिरालयात जाऊन मदिरा प्राशन तर करुन आले नाही नां? याची शंका त्यांच्या सौभाग्यवतीला येत होती. नवरोबाने हबीबगंज (भोपाळ नजीक) पोलिस ठाण्यात जाऊन बायकोविरुद्ध तक्रार केली, दोघांनाही ठाण्यात बोलावून समजाविण्यात आले आणि स्टँप पेपरवर असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आला. पाहूया या अटी तरी कोणत्या होत्या..? अटी अशा- १). एका वेळचा स्वयंपाक बायको आणि एका वेळचा नवरोबांनी करावा. २). संध्याकाळी सातच्या आत घरात..अन्यथा नवरोबांनी बाहेर झोपावे. ३). रात्री नऊनंतर टीव्ही बंद. ...