मुंबई, ता. २ नोव्हेंबर- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे ही माझी भूमिका कायम आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यास पुढाकार घेईन, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे केले. भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक ऍड. माणिकराव शिंदे, नगरसेविका उषा शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात नव्याने आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही असे सांगून भुजबळ यांनी प्रत्येक घरात पैशाची आवक होईल तेव्हाच खराखुरा विकास होईल असे प्रतिपादन केले.