दिल्ली आणि मुंबई येथील सीबीआय अधिकार्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी. असा आदेश मंगळवारी (ता. ५) केंद्रीय माहिती आयोगाने सीबीआय ला दिला आहे. एका दृष्टीने हे चांगले पाऊल असले, तरीही इतक्यात समाधान मानता येणार नाही. सीबीआय प्रमाणेच लाच-लूचपत खाते, व्हिजिलन्स खाते अशा प्रकारच्या संबंधित सर्वच खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी देखील आपली खरी संपत्ती जाहीर करणे आवश्यक आहे. या अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपल्यासह कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली संपत्ती देखील जाहीर केल्यास वास्तव सामोरे येईल... यात शंका नाही.