मुंबई, ता. २० - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिका व एमआयडीसीने संयुक्त प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासह विविध सूचना श्री. पवार यांनी केल्या. एमआयडीसीने मागणी केल्यानुसार रिकामे भूखंड परत करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून महापालिकेने देखील एमआयडीसीकडे विकास योजनेतील रस्ते आणि पाणी पुरवठा प्रकल्पासाठी जागेची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.