मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

खासगी वाहनचालकांसाठी मंडळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खासगी वाहनचालकांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्याचा शासनाचा निर्धार

मुंबई, ता. ६ - खासगी वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मंगळवारी (ता. ५) मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, खासगी वाहनचालकांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना निवृत्ती वेतन देणे आवश्यक आहे. रिक्षा, खासगी बस, ट्रक, टॅक्सी यासारख्या सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहन चालकांना अत्यंत खडतर परिस्थितीस सामोरे जावे लागते. हा घटक सामान्य जनतेला देत असलेली सेवा लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा विचार शासन करते आहे. मंडळाची स्थापना करण्यासाठी परिवहन विभाग आणि कामगार विभाग पुढाकार घेईल. यासाठी तामिळनाडूमध्ये अशा प्रकारे स्थापन करण्यात आलेल्या मंडळाचा अभ्यास केला जाईल. या बैठकीला कामगारमंत्री हसन मुश्रीफ, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, वित्त विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्ताव, कामगार विभ...