मुंबई, ता. २२- पंजाब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मानाचा "रुस्तम-ए-हिंद" किताब पटकावून सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी कामगिरी बजावलेल्या पहिलवान अमोल बुचडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काळात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. श्री. बुचडे यांनी ही कामगिरी बजावून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे राज्यात कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारात मोलाची भर पडून नवोदितांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या शब्दात श्री. पवार यांनी बुचडे यांचे अभिनंदन केले.