संग्रहित छायाचित्र नागपूर, ता.१- राज्यात अर्थसंकल्पीय निधीतून तसेच खासगीकरणांतर्गत (बीओटी) करण्यात आलेले २३ पथकर नाके कायमस्वरुपी बंद तर ११ पथकर नाक्यांवरील वसूलीस स्थगिती देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात खासगीकरणांतर्गत तयार करण्यात आलेले रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी निविदा शर्तींनुसार संबंधित उद्योजकांवर आहे. तथापि, आठ प्रकल्पांच्या उद्योजकांनी रस्त्यांचे नूतनीकरण वेळेत न केल्यामुळे त्यांच्य पथकर वसूलीस स्थगिती देण्यात आली आहे. भविष्यातही जे उद्योजक रस्त्याचे नूतनीकरण करणार नाहीत, त्यांची पथकर वसूली स्थगित करण्यात यावी, असे निर्देशही भुजबळ यांनी विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. उद्योजकांनी वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती अथवा नूतनीकरण न केल्यामुळे स्थगिती देण्यात आलेले रस्ते: १) पूर्णा-शिरूर रस्ता (राज्यमार्ग क्र. ६०), २) वडगाव-चाकण-शिक्रापूर (राज्यमार्ग क्र. ५५), ३) सातारा-पंढरपूर-मोहोळ (राज्यमार्ग क्र. ७४), ४) अक्कलकोट-मैंदर्गी (जि. सोलापूर), ५) अहमदनगर-करमाळा (राज्यमार्ग क्र. १४१), ६) अहमदनगर-दौंड (...