संग्रहित छायाचित्र |
श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात खासगीकरणांतर्गत तयार करण्यात आलेले रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी निविदा शर्तींनुसार संबंधित उद्योजकांवर आहे. तथापि, आठ प्रकल्पांच्या उद्योजकांनी रस्त्यांचे नूतनीकरण वेळेत न केल्यामुळे त्यांच्य पथकर वसूलीस स्थगिती देण्यात आली आहे. भविष्यातही जे उद्योजक रस्त्याचे नूतनीकरण करणार नाहीत, त्यांची पथकर वसूली स्थगित करण्यात यावी, असे निर्देशही भुजबळ यांनी विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.
उद्योजकांनी वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती अथवा नूतनीकरण न केल्यामुळे स्थगिती देण्यात आलेले रस्ते: १) पूर्णा-शिरूर रस्ता (राज्यमार्ग क्र. ६०), २) वडगाव-चाकण-शिक्रापूर (राज्यमार्ग क्र. ५५), ३) सातारा-पंढरपूर-मोहोळ (राज्यमार्ग क्र. ७४), ४) अक्कलकोट-मैंदर्गी (जि. सोलापूर), ५) अहमदनगर-करमाळा (राज्यमार्ग क्र. १४१), ६) अहमदनगर-दौंड (राज्यमार्ग क्र. १०), ७) अहमदनगर-टाकळी काझी-जामखेड-खर्डा रस्ता ८) अहमदनगर-आष्टी-जामखेड रस्ता (राज्यमार्ग क्र. १४२) इ.
राज्यात खासगीकरणांतर्गत तयार केलेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत उद्योजकांना सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि मुंब्रा-कौसा बाह्यवळण रस्ता, अक्कलकोट-मैंदर्गी-निंबाळ रस्ता आणि टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर राज्यमार्गावरील बार्शी बाह्यवळण मार्ग या तीन मार्गांची कामे करणार्या उद्योजकांनी वेळेत खड्डे न भरल्याने तेथील पथकर वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे.
बार्शी बाह्यवळण रस्त्यावरील खड्डे भरण्यात आल्यामुळे तेथील वसुली सुरू करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय निधीतून करण्यात आलेल्या परंतू नव्या पथकर धोरणानुसार पथकर वसूली बंद करण्यात आलेले रस्ते- कोरपणा-कोडशी रस्त्यावरील पैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम, कल्याण-बापगाव-पडघा रस्त्यावरील उल्हास नदीवरील गांधारी पुलाचे बांधकाम, पालघर-दारशेत रस्त्यावरील वैतरणा पुलाचे बांधकाम, बल्लारशा-गोंडपिंपरी आलापल्ली रस्त्यावरील कोठारी नदीवरील पूल, नागभीड-वडसा मार्गावरील हरदोली गावाजवळील वैनगंगा नदीवरील पूल, अलूरपुरी-कवठे-वाडाधरी रस्त्यावर सांगवी गावाजवळील पूल, दर्यापूर-रामतीर्थ-करतखेडा-म्हैसांग रस्त्यावर पूर्णा नदीवरील पूल, जळगाव-इदगाव-चिंचोली रस्त्यावरील तापी नदीवरील पूल. इ.