मुंबई, ता. २२- केंद्र शासनाने रायगडच्या पुनरुज्जीवनाची आणि सुशोभीकरणाची परवानगी दिल्यास शिवकालीन रायगड जसाच्या तसा उभा करून दाखवू, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. "केसरी गौरव सन्मान २०१० पुरस्कार" वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, राज्याला छत्रपती शिवरायांचा थोर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातले सुमारे साडेतीनशे गडकिल्ले त्याची थोरवी सांगतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. छत्रपतींचा हा वारसा जपून ठेवण्यासाठी त्यांची डागडुजी व सुशोभीकरण आवश्यक आहे. परंतु यासंदर्भात पुरातत्त्व खात्याचे नियम कडक आहेत. पडझड झालेल्या या गडकिल्ल्यांना भेट देऊन आपण छत्रपतींच्या आस्तित्वानं पावन झालेली माती अभिमानाने कपाळावर लावतो, मात्र इथे भेट देणार्या परदेशी पर्यटकांच्या मनात ही भावना असणं शक्य नसतं. ती निर्माण होण्यासाठी किमान तशा कल्पना येण्यासाठी तरी काही वास्तू आपण उभ्या करायला हव्यात. यासाठी प्रयोगादाखल रायगडच्या पुनरुज्जीवनाचं आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यास परवानगी देण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत आपण विनंती केंद्र सरकारलाकेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे आगामी वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी देऊन पर्यटन क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था आणि तज्ज्ञांनी आपल्या सूचना द्याव्यात असं आवाहन केलं. राज्यातील प्रचलित, अप्रचलित पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी स्वच्छता, पायाभूत सुविधा विकास करण्याबरोबरच योग्य मार्केटिंग करण्यावर आपला भर राहिल, असेही ते म्हणाले.
"केसरी गौरव सन्मान २०१०" पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. अजित फडके, कृषी क्षेत्रात अनेक यशस्वी प्रयोग करणारे कॅप्टन प्रकाश थोरात, 'सरहद' संस्थेच्या माध्यमातून काश्मिरी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी धडपडणारे संजय नाहर, धावपटू कविता राऊत, 'टाटा नॅनो' च्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे गिरीश वाघ, अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा समावेश होता. रोख रूपये एक्कावन्न हजार आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं.