संसदेचे आज विसाव्या (२०) दिवशी सुद्धा कामकाज झाले नाही. विरोधकांच्या गदारोळामुळे आज पुन्हा एकदा संसदेचे कामकाज बंद पाडण्यात आले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. विविध भ्रष्टाचार प्रकरणांसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी करत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ घालण्यात आला. यापूर्वी १९ दिवस संसदेचे कामकाज बंद पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. आज दुपारनंतर देखील संसदेचे कामकाज होऊ शकले नसल्याच्या वृत्तास सूत्रांनी दुजोरा दिला आहे. विरोधक अथवा सत्तारूढ पक्षाचे सदस्य असले तरी देखील काळ, अर्थाचा अपव्यय होऊ न देता चर्चा करून शेवटी तोडगा काढणे, उपाययोजना करणे, समाधान शोधून काढणे अत्यंत आवश्यक आहे.