मुख्य सामग्रीवर वगळा

मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही-भुजबळ

नागपूर, ता. ५- मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेतून पाच डिसेंबरला निवृत्त होणार्‍या अकरा सदस्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानपरिषदेचे अकरा सदस्य पाच डिसेंबरला निवृत्त होत असल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळ यांच्या मनोगतावर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा रोख भुजबळ यांच्याकडेच असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न श्री. रावते यांनी केला. यावर भुजबळ यांनी त्यांच्या टिप्पणीवर बोलताना म्हणाले, की अभिनय ही एक अभिजात कला आहे. ती कोणालाही सहजसाध्य नाही. नाट्य आणि नाटकीपणा यातही फरक असतो. माझ्या या नाट्यामुळेच मी २५ वर्षे तुमचा नेता होतो. विरोधी पक्षनेता बनलो आणि सत्तारूढ पक्षाला धारेवर धरले ते देखील याच नाट्याच्या जोरावर, याचं भान असू द्या. मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्य डॉ. एन. पी. हिराणी यांच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकताना, डॉ. हिराणी हे उत्तम नाट्य अभिनेते आहेत, मात्र त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यात कधीही नाटकीपणा जाणवू दिला नाही या शब्दात त्यांचे कौतुक केले. यानंतर नाट्य विषयावर शिवसेना नेते रावते व भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सुमारे तीस वर्षे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य राहिलेल्या बी. टी. देशमुख यांना काही उद्योजकांच्या विरोधी प्रयत्नांमुळे निवडणूकीत निवडून येण्यापासून वंचित रहावे लागल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या माध्यमातून विधीमंडळात थेट प्रवेश न करू शकणार्‍या विविध क्षेत्रातील विद्वान, तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ कायदेमंडळास व्हावा या दृष्टीने विधान परिषद सभागृहाची रचना करण्यात आली आहे. परंतू, या सभागृहापासून सरस्वतीपुत्र दूर रहायला लागले आणि लक्ष्मीपुत्रच पुढे येऊ लागल्यास व्यासपीठाचे औचित्य आणि पावित्र्य राहणार नाही अशी भीती श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012