मंगळवार ता. २१ डिसेंबर हा दिवस वर्षातला सगळ्यात लहान दिवस ठरणार आहे. मंगळवारी सकाळी ७.०८ वाजता सूर्योदय आणि सूर्यास्त संध्याकाळी ६.०५ वाजता होईल. पृथ्वीच्या उत्तरायणास मंगळवार ता. २१ पासून सुरवात होईल उत्तरायण वर्षातून दोनदा होते. यापैकी एक दिवस लहान आणि एक दिवस मोठा असतो. यासाठी १८० दिवसांचा कालावधी लागतो. हिवाळ्यात सूर्य विषूववृत्तापासून लांब जातो म्हणून दिवस लहान होतो. २१ डिसेंबरला सूर्य आणखी लांब जाईल परिणामी सूर्यास्त आणखी लवकर होईल. २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो.
झोपाळूंची मज्जा..केव्हा एकदा दिवस संपून रात्र होते आणि आपण झोपतो अशी वाट पाहणार्या झोपाळू लोकांसाठी आजचा दिवस पर्वणीच असून आज (मंगळवार) दिवस हा १०.५७ मिनिटांचा आणि सगळ्यात मोठी रात्र १३.०३ मिनिटांची असेल. अशी माहिती विनायकशास्त्री जोशी यांनी दिली.