क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर याने काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंचुरियन येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात सेंचुरी केली. आपल्या कारकीर्दितली सचिन याची कसोटी सामन्यातील पन्नासवी सेंचुरी (शतक) आहे.सचिनचे करावे तितके कौतुक थोडे आहे...
सुरवातीपासूनच उत्कृष्ट फलंदाजी करून भल्या भल्यांना पाणी पाजणार्या सचिनकडे क्रिकेटप्रेमी अपेक्षेनेच पाहू लागले. कसोटी सामन्यात पन्नासवे शतक झळकावणारा सचिन हा आज संपूर्ण जगातला, क्रिकेट विश्वातला पहिला बॅट्समन् झालाय. सचिनचे आता वय झाले आहे, सचिनने आता निवृत्त व्हावे म्हणणार्यांना त्याने अजूनही आपण 'फिजिकली-फिट्' असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सुद्धा ते म्हातारे झाले पण सचिन अजूनही तरूण आहे या शब्दात सचिनबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. गानसम्राज्ञी आशा भोसली यांनी तर सचिनला आता भारत-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन केले आहे. एकदिवसीय सामन्यांमध्येही सचिनची ४६ शतके पूर्ण झाली असून तिथेही सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी सचिनला मिळणार आहे. हा विक्रम नोंदवण्यास सुद्धा केवळ चार शतकांनी दूर असलेला सचिन ही अपेक्षा देखील पूर्ण करेल, हीच अपेक्षा!