मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तम कांबळे यांना मानाचा मुजरा...

दैनिक सकाळचे मुख्य संपादक, साहित्यिक आणि नियोजित अखील भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे साहित्य आता कन्नड भाषेत देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. श्री. कांबळे यांच्या समृद्ध लेखणीतून तयार झालेल्या प्रत्येक शब्दाने साहित्य आणखी समृद्ध परिपक्व केल्याचे हे द्योतक ठरावे. मराठी भाषेत आणि विशेष म्हणजे लेखणी-साहित्यात किती गोडवा आहे हे यावरून लक्षात येते. श्री. कांबळे यांनी लेखणीत मराठी शब्द असे वळविले की दुसर्‍या भाषेला सुद्धा मराठीकडे वळावे लागले असून फलश्रृती म्हणजे कन्नड भाषेत देखील त्यांच्या साहित्याचा अनुवाद करण्यात येणार आहे. साहित्यिक सर्जू काटकर यांनी, कांबळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे रूपांतर कन्नडमध्ये केल्यानंतर कन्नड भाषेत सुद्धा अल्पावधीतच हे पुस्तक बहुश्रृत झाले. श्री. कांबळे यांच्यावर आईने मायेने फिरवलेला हात आणि मोरपिसाच्या मंद वार्‍याची झुळूक आणि शब्दांचा दरवळ या जादूने हे साध्य झाले आहे.
इंग्रजाळलेली मराठी बोलणार्‍या, मराठी असूनही एकमेकांशी इंग्रजी अथवा दुसर्‍या भाषेत संवाद साधणार्‍या बांधवांनी यातून बोध जरूर घ्यावा, ही अपेक्षा..!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012