गेल्या आठवड्यात कांद्याने रडविल्यामुळे, काळ्या बाजाराचे व्यापारी हसले होते. कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. कांद्याचे प्रकरण ताजे असतानाच काही भागातील बाजारपेठेत टोमॅटो देखील निकृष्ट दर्जाचे दाखल होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासह भुईमुगाच्या तेलासह, साबुदाणा, शेंगदाणा, खोबरे, तीळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. महागाईविरुद्ध शासनाशी संघर्ष करण्याची तयारी विरोधी पक्ष करीत आहेत.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.