रविवार, १६ डिसेंबर, २०१२
शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२
रमाबाई रानडे..आमच्या आयुष्यातील काही आठवणी
Dear All,
Please go through URL/LINK below, for more details! I am requesting you all on behalf of my friend Mr. Upendra G. Phadke.
http://www.bookganga.com/eBooks/Book/5593731033121577112.htm?Book=Amchya-Ayushyatil-Kahi-Athvani
http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?BID=5593731033121577112
Thanks,
Sushrut.

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२
HAPPY DASRA!!!
सोनेरी क्षणांनी यावी हाती सोनेरी पाने...
वेचुन घेण्यासाठी आपले हात पुढे "पसरा"...
झाले आहे सुरू आता सुवर्ण युग नवे,
साजरा करू या चला सारे "दसरा"...
दसर्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
Soneri Kshananni yavi haati Soneri Pane.
Vechun ghenyasathi aaple haat pudhe "pasra".
Zale aahe suru aata 'Suvarn Yuug' nave,
Sajara Karu Ya Sare "Dasra"!
Happy Dasra!!!

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२
रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२
गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२
ग्रामपंचायत निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ
मुंबई, दि. 4 : राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांबाबतच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील निकषात बदल केला आहे. मागासवर्गीय उमेदवारांना याचा लाभ मिळावा म्हणून 21 ऑक्टोबर 2012 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 5 ऑक्टोबर ऐवजी 6 ऑक्टोबर 2012 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.
राज्यातील 4 हजार 637 ग्रामपंचायतींसाठी 21 ऑक्टोबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने 25 सप्टेंबर 2012 रोजी केली होती. त्यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम 10-1अ मधील तरतुदीनुसार आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबतच जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते; परंतु त्यात आता राज्य शासनाने सुधारणा केली आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नसल्यास संबंधित उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे जातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी दिल्याची पावती किंवा पुरावा नामनिर्देशनपत्रासोबत जोडावा; तसेच निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भातील हमीपत्रदेखील नामनिर्देशनपत्रासोबत देण्याची तरतूद केली आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी राज्य शासनाने अधिनियमात ही दुरुस्ती केली आहे. त्याचा मागासवर्गीय उमेदवारांना लाभ मिळावा व ते निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने पूर्वनियोजित ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात अंशत: बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 6 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 ऑक्टोबर ऐवजी 8 ऑक्टोबर 2012 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत 8 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदानाच्या दिनांकात कोणताही बदल केला नसून पूर्वनियोजनाप्रमाणे 21 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2012 रोजी होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही राज्य निवडणूक आयुक्त यांनी सांगितले.

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२
सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२
दहा नगरपरिषदांसाठी ४ नोव्हेंबरला मतदान- आजपासून आचारसंहिता लागू
मुंबई, ता. १- डहाणू, जव्हार, इगतपुरी, त्र्यंबक, नंदुरबार, तळोदा, नवापूर, किनवट, चिखलदरा, आणि पांढरकवडा या दहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. या नगरपरिषदांच्या क्षेत्रात आज (ता. १ ऑक्टोबर) रात्री बारापासून आचारसंहिता लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडणुकांसाठी चार ते दहा ऑक्टोबर २०१२ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जाणार नाहीत. ११ ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबररोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. २७ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याची दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. चार नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी साडेसहानंतर किंवा सर्व मतदान केंद्रांवरील मतदान संपल्यावर किंवा दुसर्या दिवशी पाच नोव्हेंबरला मतमोजणी होईल. यासंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
नगरपरिषदनिहाय जागांचा तपशील (कंसात महिला राखीव): इगतपुरी- १९ (१०), त्र्यंबक- १७ (९), किनवट- १७ (९), नंदुरबार- ३७ (१९), तळोदा- १७ (९), डहाणू- २३ (१२), जव्हार- १७ (९), चिखलदरा- १७ (९) आणि पांढरकवडा- १७ (९).
वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४८ मधील सदस्य संजय रामडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. १७ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक १९ ऑक्टोबर असेल. २० ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील व अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत होईल. दुसर्या दिवशी पाच नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता मतमोजणी होईल. संबंधित प्रभाग क्षेत्रात आज रात्री बारापासून आचारसंहिता लागू होईल व ती निकाल जाहीर होईपर्यंत राहील, असेही राज्य निवडणूक आयुक्त श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

वसई-विरारमध्ये ४ नोव्हेंबरला एका जागेसाठी पोटनिवडणूक

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२
मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१२
Mega Fund Raising Event for Computer Aided Literacy in 10 schools
Navi Mumbai (Dt: 18)- Rotary club of Navi mumbai had organised a spectacular Musical
Extravaganza on saturday 15th September, at vishnudas bhave Auditorium,
Vashi. The Theme for the 160th show of Klub Nostalgia was the songs of
the super stars of yesteryears Shammi kapoor and Dev anand.
A packed to capacity audience were enthralled by the
outstanding performances of singers---Anil Bajpai, Shailaja, Sandeep and
Vrushali. The musical team led by Ajay Madan, gave a scintillating
performance. The Musical prog was interspersed with Humour by the
Anchor, Rtn Premkumar, who is also the President of the club.
Speaking on the occasion,the President of the club
mentioned that the Fund Raising prog was to meet the expenses of a
Revolutionary Educational project which would have a major impact in the
community in Navi mumbai, as over 3000 students are likely to benefit
from the computer literacy programme. The fund raising comitte for the
Mega project of Rotary Club of Navi Mumbai was spearheaded by Rotarian
Anand Natrajan and his team of Rotarian Amar Nair, Rotarian Laxmi,
Rotarian Surekha Mathre and Rotarian Kanchan Todi Roy.
Another unique feature if the show was on-the-spot dedication of songs which brought in good donations for a noble cause.
Klub
Nostalgia which believes in spreading Happiness through Music, also
donate all their proceeds to Charity. Music lovers were in a state of
frenzied delight , as they clapped, sang, and danced to the lilting
melodies. The experience proves beyond doubt that Music is the best anti
dote for a hectic, stressful living. In short it was an awesome Musical
treat.
विकास कामांची गती वाढविण्यासाठी प्रगतीशील रहा- प्रमोद हिंदूराव
आपल्या भाषणात श्री. हिंदुराव पुढे म्हणाले की, सिडकोने पर्यटन स्थळांच्या निर्मितीत पुढाकार घेतला पाहिजे. भरीव कार्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. आपल्या पदाचा, शिक्षणाचा आणि हिंमतीचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी करण्याकरिता पुढाकार घ्यावा असा आग्रह त्यांनी आपल्या भाषणातून केला. सिडको अधिकार्यांसाठी स्पोर्टस क्लबची निर्मिती करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे आपल्या भाषणात म्हणाले की, सिडकोच्या प्रगतीत अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे. सिडकोने प्रत्येक प्रकल्पाचे योग्य नियोजन केले म्हणूनच नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असा नावलौकिक मिळविला. भविष्यात आपणास भरपूर वाव आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प विकासाधीन आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे आजुबाजूच्या २५ कि.मी. अंतरापर्यंतच्या क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यामुळे जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रात आपण कार्यरत होणार आहोत. सिडकोकडे नवीन शहरांचे अनेक प्रकल्प येत आहेत. भविष्यात कामांचा विस्तार होणार आहे त्यामुळे आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा आग्रही सल्ला त्यांनी उपस्थित अभियंत्यांना केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ख्यातनाम गीतकार प्रा. प्रवीण दवणे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, चांगली सांस्कृतिक पार्श्वभूमी आपणास लाभली आहे, त्यामुळेच समर्पित भावनेने आपण काम करीत आहात. आपण एवढं सुंदर शहर निर्माण केलं कारण आपण सर्व सृजनशील आहात असे गौरवाोर काढून भावी पिढीला भाषेच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्या आणि किमान एक भाषा पूर्णतेने शिकवा असा आग्रहाचा सल्ला दिला.
या अभियंता दिनाच्या निमित्ताने तांत्रिक विषयांवरील प्रेझेंटेशन व व्.याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते त्यात नद्या जोडणी सारख्या अनवट, अनघट विषयावर श्री. चेतन पंडीत यांनी नितळ, सुश्राव्य असे व्याख्यान दिले. दुपारच्या सत्रात मेसर्स स्ट्रक्टवेल कन्स्लटंट प्रा. लि. चे श्री. चेतन रायकर यांनी 'डिटेक्शन ऑफ अंडरग्राऊंड युटीलिटी सर्व्हिसेस' या विषयावर तर मेसर्स बिमस्टार चे श्री. राजू जगताप यांनी 'बिल्डींग इनफॉर्मेशन मनेजमेंट सर्विसेस' या विषयावर आणि मेसर्स आयएल अन्ड एफएस चे श्री. चेतन जव्हेरी यांनी 'सॉलीड वेस्ट मनेजमेंट टेक्निक्स' या विषयावर पॉवर पाँईट सादरीकरणासह माहिती दिली आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसन केले.
अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सर एस. विश्र्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री. संजय चौधरी, मुख्य अभियंता (दक्षिण), श्री. केशव वरखेडकर,
मुख्य अभियंता (उत्तर) यांचीही भाषणे झाली.
मुख्य अभियंता (उत्तर) यांचीही भाषणे झाली.
अभियंता दिनाच्या अनुषंगाने सिडको इंजिनियर्स असोसिएशन तर्फे अभियंत्यांसाठी 'टेक्नीकल पेपर्स' लेखनाचा उपक्रमही राबविण्यात आला. यात एकूण १३ अभियंत्यांनी ८ विविध विषयांवरील पेपर्स सादर केले होते. त्यातील श्री. एस. एम. बोंडे यांच्या 'लेझर स्कनिंग'-अ हाय डेफिनेशन सर्व्हेइंग टेक्नॉलॉजी फॉर इफिशियंट प्रोजेक्ट प्लनिंग अन्ड एक्झीक्यूशन मॉनिटरींग, श्री. एस. बी. ठाकूर, सहाय्यक अभियंता (लॅब) आणि श्री. ए. के. पाटील, सहाय्यक अभियंता (लॅब) यांच्या 'बेसीक मिक्स डिझाईन ऑफ कॉन्क्रीट' आणि श्री. के. एम. गोडबोले (कार्यकारी अभियंता, गुणवत्ता परीक्षण), श्री. डी. जे. रांजोळकर (सहाय्यक कार्यकारी अभियंता-प्रयोगशाळा) आणि श्री. एन. बी. कुलकर्णी (सहाय्यक अभियंता - प्रयोगशाळा) यांच्या 'युज ऑफ रूबो/मॅन्युफक्चर्ड क्रश्ड सॅन्ड इन कॉन्क्रीट फॉर ग्रेड एम-२० आणि एम-३० या पेपर्सना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाच्या निवड परिक्षक मंडळात श्री. एस. आर. दराडे, महाव्यवस्थापक (विमानतळ), श्री. संजय नाडगौडा, कार्यकारी अभियंता (मेट्रो) आणि श्री. नंदकुमार निमकर यांचा समावेश होता.
त्याचबरोबर मागील वर्षी सर्वोत्तम कार्य करणार्या अभियंत्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रेणीतून गोल्फ कोर्स प्रकल्पाकरिता श्री. दिलीप बोकडे यांना तर सहाय्यक अभियंता श्रेणीतून खांदा उड्डाण पूल प्रकल्पाकरिता श्री. अभिजित मराठे आणि स्ट्रक्चरल डिझाईनकरिता श्री. राजीव कोलप यांना सेवा उत्कृष्टतेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या निवड परीक्षक समितीत श्री. व्ही. एस. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता (प व क), श्री. पी. डब्ल्यू. डहाके, अधिक्षक अभियंता (टीपी-३),
श्री.
आर.
बी.
धायटकर, अधिक्षक अभियंता (वाशी) आणि श्री. अरविंद शेंडे, वरिष्ठ परिवहन अभियंता यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...