मुंबई, ता. १- डहाणू, जव्हार, इगतपुरी, त्र्यंबक, नंदुरबार, तळोदा, नवापूर, किनवट, चिखलदरा, आणि पांढरकवडा या दहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. या नगरपरिषदांच्या क्षेत्रात आज (ता. १ ऑक्टोबर) रात्री बारापासून आचारसंहिता लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडणुकांसाठी चार ते दहा ऑक्टोबर २०१२ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जाणार नाहीत. ११ ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबररोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. २७ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याची दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. चार नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी साडेसहानंतर किंवा सर्व मतदान केंद्रांवरील मतदान संपल्यावर किंवा दुसर्या दिवशी पाच नोव्हेंबरला मतमोजणी होईल. यासंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
नगरपरिषदनिहाय जागांचा तपशील (कंसात महिला राखीव): इगतपुरी- १९ (१०), त्र्यंबक- १७ (९), किनवट- १७ (९), नंदुरबार- ३७ (१९), तळोदा- १७ (९), डहाणू- २३ (१२), जव्हार- १७ (९), चिखलदरा- १७ (९) आणि पांढरकवडा- १७ (९).
वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४८ मधील सदस्य संजय रामडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. १७ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक १९ ऑक्टोबर असेल. २० ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील व अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत होईल. दुसर्या दिवशी पाच नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता मतमोजणी होईल. संबंधित प्रभाग क्षेत्रात आज रात्री बारापासून आचारसंहिता लागू होईल व ती निकाल जाहीर होईपर्यंत राहील, असेही राज्य निवडणूक आयुक्त श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

वसई-विरारमध्ये ४ नोव्हेंबरला एका जागेसाठी पोटनिवडणूक