मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळणार्या संशयित पोपट शिंदे याचा मृत्यू झाला. निर्ढावलेल्या भ्रष्टाचाराने आणि भ्रष्टाचारास पोसणार्यांच्या स्वैराचारामुळे पोपट शिंदेंप्रमाणेच नवीन भेसळ माफिये तयार होऊ न देणे, यशवंत सोनवणे यांच्यासारख्या चांगल्या शासकीय अधिकार्यांसाठी आणि भ्रष्टाचारमुक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. नाशिक परिक्षेत्रातील मालेगाव जिल्ह्यातील पानेवाडी प्रकल्पाजवळ इंधनात भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यावरून यशवंत सोनवणे संबंधित ठिकाणी छापा मारण्यासाठी गेले होते. घडत असलेला भेसळीचा प्रकार गंभीर आणि त्याचे स्वरूप मोठे असलेले पाहून सोनवणे यांनी आणखी काही अधिकार्यांना पाचारण करण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. पोपट शिंदे याला समज देतानाच परिस्थिती आणखी चिघळली, यामुळे आणखी अधिकारी, कर्मचारी आवश्यक होते. दरम्यान, सोनवणे यांच्याशी झालेल्या बाचाबाची पोपट शिंदे आणि सहकार्यांनी सोनवणे यांच्या अंगावर इंधन टाकून त्यांना जीवंत जाळले. यात सोनवणे यांचा घटनास्थळीवरच मृत्यू झाला होता. शिंदे याला सोनवणे यांनी पकडून ठेवल्यामुळे तो देखील सुमारे सत्तर टक्के जळाल्यामु...