मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Yuvraj Sing लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युवराज सिंगची हॉस्पिटलमधून सुट्टी...

क्रिकेटपटू युवराज सिंग याची आज बोस्टन (अमेरिका) येथील हॉस्पिटलमधून अखेर सुट्टी करण्यात आली. केमोथेरपी च्या तिसर्‍या आणि शेवटच्या चरणानंतर युवराज याला सुट्टी देण्यात आली आहे. "अखेर तिसरे चरणही संपले, आता आपण मी जाण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही, मी मोकळा झालोय...माझ्या सर्व चाहत्यांना आणि अमिष्ट चिंतन करणार्‍यांचे आभार.." या शब्दात युवराजने आपला आनंद देखील व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात युवराज याला बोस्टन येथे केमोथेरपी करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. युवराज मैदानावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊल ठेऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. केमोथेरपीच्या उपचारांदरम्यान युवराज याचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळाले आहेत. सचिनचे शतकांचे शतक अर्थात महाशतक झळकल्यामुळे त्याने सचिन तेंडुलकरचे ट्विटर वर tweet करून अभिनंदन केले आहे.

युवराज सिंग याला कॅन्सर...

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. भारताचा ज्येष्ठ फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून तो अजून पहिल्या चरणातच असून यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डाव्या फुप्फुसात ट्यूमर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र अष्टपैलू युवराज याला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच कसोटी सामने आणि एक दिवसीय मालिकेस मुकावे लागले. त्याच्यावर अमेरिकेत सध्या केमोथेरपि सुरू आहे. दरम्यान, काही बातम्यांमध्ये युवराज अमेरिकेस शस्त्रक्रियेसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु 1 फेब्रुवारीला युवराजने ट्विटरवर, आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे ट्विट केले होते. विश्वचषकापासूनच युवराज याच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. यानंतर तो केवळ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनाच खेळू शकला होता.