' गेलेला काळ आणि वेळ पुन्हा येत नसते ' असे म्हणतात , म्हणून ' मिळेल त्या संधीचे सोने करावे ' असा सल्ला वडिलधारे देतात. दहा वर्षाचा काळ देखील थोडा-थोडका नसतो. माणसाने त्याच्या आयुष्यातले वाईट दिवस विसरावे मात्र गतकाळ विसरू नये. "कालाय तस्मै नमः" प्रमाणे येणार्या काळाला , उगवत्या सूर्याला नमस्कार करावा. नुकत्याच पूर्ण झालेल्या दशकाल्या कळत-नकळत झालेल्या चुका पुन्हा होऊ नये या अपेक्षेने नव्या जोमाने , उमेदीने कामाला सुरवात करावी... नव्या दशकात शासनासह समाजातल्या सगळ्याच घटकांकडून या १० "द" च्या अपेक्षा: दहशतवाद निर्मूलन : आज भारतासह सगळ्या जगासमोर प्रमुख मुद्दा बनलेले संकट दहशतवाद हे आहे. काही देश आपल्या सीमेलगत असलेल्या देशांची जमीन बळकावण्यासाठी तर काही देश दुसर्या देशात हिंसाचार वाढवण्यासाठी दहशतवादी तयार करत आहेत , येन केन प्रकारेण त्यांना मदत करून दहशतवादास खतपाणी घालत आहेत. सध्या भारतावर तिसरी महाशक्ती म्हणून पाहिले जात आहे. आजमितीस देश संरक्षण क्षेत्रात सुद्धा बर्यापैकी विकसित झ...