मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भारत त्रिनिदाद सहकार्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पर्यटनवृद्धीसाठी भारत व त्रिनिदाद यांच्यात द्वि-पक्षीय सहकार्य वाढविण्याची गरज

मुंबई, ता. १३ - भारत आणि रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगो यांच्यात पर्यटन क्षेत्रात द्वि-पक्षीय सहकार्य वाढीस लागावे यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री म्हणून प्रयत्न करण्यास आपल्याला निश्चितपणे आनंद वाटेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले. रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगोचे पर्यटनमंत्री रुपर्ट ग्रिफीथ यांच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यीय शिष्टमंडळाने आज सकाळी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, विश्वविख्यात क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्यामुळे त्रिनिदादचे नाव जगभरात झाले आहे. या निसर्गसमृद्ध देशासोबत पर्यटन सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दरवर्षी भारतातील सुमारे ११ दशलक्ष पर्यटक अन्य देशात पर्यटनासाठी जातात. वेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक असणार्‍या कित्येक भारतीय पर्यटकांसाठी त्रिनिदाद हा उत्तम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. शिष्टमंडळाच्या होणार्‍या चर्चेतून सकारात्मक गोष्टी निश्चितपणे निष्पन्न होतील अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली. श्री. ग्रिफीथ यांनी त्रिनिदाद व टोबॅगोचे राष्ट्रीय वाद्य असलेल्या स्टील-पॅनची प्रतिकृती श्री. भुजबळ यांना भेट दिली