मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

उत्तर प्रदेश लेबलसह पोस्ट दाखवत आहे

निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची भेट ठरणार-मायावती

नवी दिल्ली - ता. 15: आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा विजय होणे हीच आपल्या वाढदिवसाची भेट ठरेल, असे मत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी व्यक्त केले. आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्या बोलत होत्या. आचारसंहितेमुळे वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले, की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पक्ष यंदा आपल्या वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. पक्ष कार्यकर्ते संक्रांत त्यांच्या कुटुंबियांसमवेत साजरी करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करणे हेच आपले लक्ष्य असून निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरणार आहे. यावेळी त्यांनी सर्व 403 जागांकरिता उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुकीसाठी 88 जागा अल्पसंख्यांक, 103 अन्य मागासवर्गीय, 85 मुस्लीम आणि 117 जागांपैकी 74 जागा ब्राह्मण आणि 33 जागांसाठी क्षत्रिय उमेदवारांना पक्षातर्फे निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, की गेल्या निवडणुकीत चुकीच्या उमेदवारांना निवडणुकीत उभे रहाण्याची संधी ...