मुंबई, ता. १३ - महानगरपालिका निवडणुकीतील महिला उमेदवारांना नियमाप्रमाणे केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक असते, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवारांना केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम भरणे आवश्यक असताना काही ठिकाणी पाच हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात आले. त्यानुसार ज्या महिला उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली आहे त्यांना अडीच हजार रुपये तात्त्काळ परत करण्यात यावेत. तसेच यापुढे होणार्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नियमातील तरतुदीनुसारच अनामत रक्कम घेतली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकार्यांना देण्याबाबत सर्व महानगरपालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार करता येत नाही. परंतु घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर बंदी नाही. याचबरोबर प्रचार समाप्तीनंतर किंवा मतदानाच्या दिवशी के...