मुंबई, ता. १८ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणार्या जमिनीसंदर्भात येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांचे समाधान होईल, असे पुनर्वसन आणि पुनःस्थापना धोरण अवलंबिण्यात येईल तसेच या प्रकल्पग्रस्तांचे १२.५ टक्के भूखंड वाटपाबाबतचे अधिकारही अबाधित राहतील. अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली आहे. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेटी दरम्यान पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. सिडको अध्यक्ष नकुल पाटील, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे उपस्थित होते. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांची सद्यस्थिती जाणून घ्यावी तसेच सिडकोच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण नवी मुंबईस भेट देत आहोत. नवी मुंबई विमानतळ लवकरात लवकर आकारास यावे तसेच येथून स्थलांतरीत होणार्या प्रकल्पग्रस्तांची योग्य काळजी घेतली जावी या अनुषंगाने सिडको आणि शासन स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सिडकोच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, १९७० साली केवळ १.१७ लक्ष लोकसंख्या अ...