मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भूकंप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धन्य ते जपान...

गेल्या आठवड्यात जपानमध्ये रिश्टर स्केल 8.1 तीव्रतेच्या झालेल्या भूकंपात झालेली प्रचंड हानी आणि यानंतर आलेली त्सुनामी यांचा सामना अजूनही जपान करतोय. सुमारे 15 हजार नागरिक बेपत्ता असल्याचा शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात ही संख्या निश्चितच फार मोठी असेल. फुकुशिमा शहर जवळपास फुंकलेच गेले असून शिमग्यापर्यंत शिमा शिल्लक राहणार की नाही अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञांना वाटत असून अभ्यास करून त्यांनी 48 तासांची मुदत दिली. जपानच्या अणूभट्ट्यांमध्ये लागलेली आग यानंतर झालेले रेडिएशन यामुळे तर आता रेडिएशनचे हे ढग अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जपानच्या अणूभट्ट्या वाचविण्यासाठी अमेरिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. परंतू सदैव सैनिका पुढेच जायचे..या उक्तीप्रमाणे या देशाने आजपर्यंत केलेली प्रगती आणि विकास निश्चितच प्रशंसनीय आहे. वारंवार किरकोळ प्रमाणावर भूकंप होत असल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकास, लहान मुलांना देखील भूकंपजन्य परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी आणि काळजीचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणच फार मोठी भूमिका पार पाडत आहे. त्सुनामी येऊन पुढे झालेले नुकसान हा भाग वेगळा...मात