मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अमेरिकन महिला लोकप्रतिनिधी शिष्टमंडळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अमेरिकन महिला लोकप्रतिनिधी शिष्टमंडळ राजकीय व व्यावसायिक भेटीवर

मुंबई, ता. १०- अमेरिकेतील महिला लोक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यात मूळच्या भारतीय मात्र सध्या अमेरिकेतील आयोवा प्रांताच्या सिनेटर स्वाती दांडेकर यांचा समावेश होता. अमेरिकन महिला लोकप्रतिनिधींच्या या शिष्टमंडळाने नागपूर येथे भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी विविध विषयांवर चर्चा केली. महात्मा फुले यांनी भारतात सर्वप्रथम समतेचा लढा उभारताना अमेरिकेत अफ्रो-अमेरिकन बांधवांवर सुरू असलेल्या अत्याचारांचाही विरोध केला आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणारे ते पहिले आशियाई नागरिक होते, असे सांगताच शिष्टमंडळातील सदस्या भारावून गेल्या. भुजबळ यांनी भारतातील प्रकल्प मान्यतेची प्रक्रिया, प्राधान्यक्रम आणि सार्वजनिक-खासगी सहभागातून राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या विषयी देखील तपशीलवार माहिती दिली. नॉर्थ डकोटाचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात स्वाती दांडेकर यांच्यासह अमेरिकन नॅशनल फाऊंडेशन फॉर विमेन लेजिस्लेचर्स या संघटनेच्या अध्यक्ष जेनिटा वॉल्टन, संघटनेच्या