मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

राष्ट्रीय सुट्ट्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करता येईल- नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 24 - प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यात ध्वजारोहण करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत प्रजासत्ताक दिन येत असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली जात होती. त्यासंदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास हरकत नसली तरी नेहमीच्या ध्वजारोहण स्थळात बदल करण्यात येऊ नये, या समारंभात करण्यात येणारी भाषणे देशासाठी हुतात्मे झालेल्यांच्या आणि देशाच्या गौरवापुरतीच मर्यादित असावीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रचाराची भाषणे होणार नाहीत आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.